ग्रामपंचायत बिजोरसे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

ग्रामपंचायत माहिती

बिजोरसे हे नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात वसलेले एक प्रगत आणि कृषिप्रधान गाव असून गावाची एकूण लोकसंख्या १९४० आहे, त्यामध्ये ९१८ स्त्रिया व ९८२ पुरुषांचा समावेश होतो. गावाचे एकूण क्षेत्रफळ ५७१ हेक्टर असून त्यापैकी गावठाण ३.७२ हेक्टर, तर उर्वरित क्षेत्र शेतीयोग्य जमिनीवर पसरलेले आहे. शेतीमध्ये कोरडवाहू, बागायती आणि पडीत जमीन असून मुख्य पिकांमध्ये बाजरी, गहू, मका, सोयाबीन, कांदा, टोमॅटो व विविध भाजीपाला यांचा समावेश होतो. सिंचनासाठी गावात २६० विहिरी, १५० बोअरवेल, १५ शेततळे, ४ बंधारे, २ तलाव तसेच एक नदी उपलब्ध आहे. गावात पिण्याच्या पाण्यासाठी नळ पाणी पुरवठा योजना कार्यरत असून विहिरींची देखील मदत घेतली जाते. सांडपाणी व्यवस्थेसाठी गटारी व शोषखडे उपलब्ध आहेत. गावात ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी चावडी, उपकेंद्र आणि एक खाजगी दवाखाना अशा आवश्यक सरकारी व आरोग्य सुविधा आहेत. शैक्षणिक सुविधांमध्ये एक अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तसेच मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माध्यमिक विद्यालय यांचा समावेश आहे. गावात एकूण २१० पक्की व २०० कच्ची घरे आहेत. गावातील प्रमुख धार्मिक स्थळांमध्ये हनुमान मंदिर, भवानी माता मंदिर, प्रभू श्रीराम मंदिर आणि बुद्ध विहार यांचा समावेश होतो. तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गावात कार्यरत आहे.

बिजोरसे २०११ च्या जनगणनेचा तपशील

ग्रामपंचायत माहिती
गावाची सर्वसाधारण माहिती – बिजोरसे ता. बागलाण जि. नाशिक
ग्रामपंचायत माहिती
ग्रामपंचायतीचे नावबिजोरसे ता. बागलाण जि. नाशिक
कार्यकारी मंडळ (सन २०२५)1) सुभाष देवचंद अहिरे – प्रशासक
2) सतिश शांताराम निकम – ग्रामपंचायत अधिकारी
3) राजाराम आ. सोमवंशी – पाणीपुरवठा कर्मचारी
4) योगेश आ. सोमवंशी – कर्मचारी
5) अभिषेक भरत काकडे – संगणक परिचालक
6) पुनम अभिषेक काकडे – ग्रामरोजगार सहाय्यक
लोकसंख्या1940 (पुरुष – 982, स्त्रिया – 918)
एकूण कुटुंब संख्या410
साक्षरता प्रमाण (अंदाजे)76%
अनुसूचित जाती46
अनुसूचित जमाती261
भौगोलिक व प्रशासनिक माहिती
एकूण क्षेत्र571 हेक्टर
गावठाण3.72 हेक्टर
शेतीक्षेत्र571 हेक्टर
कोरडवाहू716 हेक्टर
बागायती450 हेक्टर
पडीत37 हेक्टर
वनजमीन21.73 गुंठे
गायरान जमीनहोय
मैदाननाही
शासकीय कार्यालये व सेवा
तलाठी चावडीबिजोरसे
ग्रामपंचायत कार्यालयउपलब्ध
आरोग्य उपकेंद्र1
खाजगी दवाखाने1
शिक्षण व प्रशिक्षण सुविधा
अंगणवाडी1
प्राथमिक शाळाजि.प. शाळा बिजोरसे
माध्यमिक विद्यालयमराठा विद्या प्रसारक विद्यालय
घरांची माहिती
पक्की घरे210
कच्ची घरे200
पाणीपुरवठा व्यवस्था
नळ पाणी योजना1 – गाव पाणी पुरवठा योजना
इतर व्यवस्थाविहिरी
सांडपाणी निचरा
गटारीहोय
शोषखडेहोय
घनकचरा व्यवस्थापन
घनकचरा निर्गत व्यवस्थाउपलब्ध
शेती व पिके
मुख्य पिकेबाजरी, टोमॅटो, भाजीपाला, कांदे, गहू, मका, सोयाबीन
सिंचन सुविधा
विहिरी260
बोअरवेल150
शेततळे15
बंधारे4
तलाव2
नदी1
स्वयंसेवी संस्था
सहकारी संस्थाविविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी
Scroll to Top